राष्ट्रीय महामार्ग पुणे - नाशिकवर दोन भीषण अपघात
संगमनेर तालुक्यातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग पुणे - नाशिक हा अपघाताचे प्रवण क्षेत्र बनतो आहे. दिवसेंदिवस अति मंदपणे महामार्गाचे काँक्रिटीकरण चालू आहे गेले कित्येक महिन्यापासून कॉंक्रिटीकरणाच्या नावाखाली वाहन चालकांना वेठीस धरल्याचा प्रकार चंदनापुरी घाटात बघायला मिळत आहे.
अनेकांनी आपला जीव या घाटात गमावला आहे तरी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, टोल प्रशासन यांना याविषयी काही घेणं देणं नसल्यासारखा प्रकार सध्या पुणे-नाशिक महामार्गाच्या चंदनापुरी घाटात घडत आहे.
कार चालकांनी चकवा दिल्यामुळे चाकण वरून जळगावकडे लोखंड घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त झाला कोणतीही जीवित हानी झाली नाही तर दुसरीकडे ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक चालकाने ट्रक सरळ शेतात घातल्यामुळे मोठा अनर्थ टळला तर एकेरी वाहतूक असल्यामुळे समोरून येणाऱ्या मोटर सायकलने कंटेनरला धडक दिली यामध्ये मोटरसायकल चालक गंभीरित्या जखमी झाला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली