LOKSANDESH NEWS
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा शहराजवळ भीषण अपघात, तीन जण ठार तर चार जण गंभीर जखमी
- बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर आज पहाटेच्या सुमारास आर्टिगा कार आणि ट्रक मध्ये भीषण अपघात घडला.
या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून सर्वांना खामगावच्या उपजिल्हा रुग्णालयात घालवण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की कार मधील अडकलेल्या जखमी व मृतांना बाहेर काढण्यासाठी दोन तास प्रयत्न करावे लागले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.