लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून करणारा आरोपी सौरभ बंडू लाखे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए. सिन्हा यांनी जन्मठेप आणि विविध कलमाखाली २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. उपनिरीक्षक रमेश राठोड यांच्या तक्रारीनुसार सौरभ लाखे व त्यांची प्रेयसी लग्नासाठी आरोपीकडे तगादा लावल्याने भांडण सुरू होते. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०८:३० वाजेच्या सुमारास सौरभ त्याच्या साथीदारांनी प्रेयसीच्या राहत्या घरी गळा दाबून खून केला. व रुमालाला कुलूप लावून तो वैजापूर तालुक्यातील शिवुरला निघून गेला. १६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी आरोपी परत प्रेयसीच्या घरी आला.
व त्याने प्रेयसीचे मुंडके व डावा हात कापून पिशवीमध्ये भरून दुचाकीवर शिवुर येथे नेऊन फर्निचरच्या गोडाऊन मध्ये लपवला. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी आरोपी सौरभ व त्याचा साथीदार कार मध्ये प्रेयसीच्या घरी आले मुंडके आणि हात नसलेले धड कार मध्ये टाकून नेत होते. नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अटक केली. नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याबाबत सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्याच अनुषंगाने खटल्याचे सुनावणी वेळी तत्कालीन निरीक्षक विनोद सलगरकर यांनी तपासानंतर दोषार पत्र दाखल केले सहाय्यक लोक अभियोक्ता अरविंद परशुराम बागल यांनी २८ साक्षीदारांची जबाब नोंदविले. त्यात प्रेयसीची मैत्रीण इमारतीतील दोन भाडेकरू सी.सी.टीव्ही फुटेज डॉक्टर आणि पंचाची साक्ष महत्त्वाची ठरली. गुन्ह्यातील उर्वरित दोघांची सबळ पुराव्या अभावी निदोर्ष मुक्तता केली असल्याची माहिती सरकारी वकील अरविंद बागुल यांनी दिली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली