वर्तकनगर नाक्यावरील पत्त्यांचा क्लब बंद करा, ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची मागणी
प्रभाग समिती अंतर्गत ठामपाच्या योजनेअंतर्गत अडथळा ठरत असलेल्या बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब बंद करण्याचे आदेश देऊन ठामपा आयुक्त यांना सदरचे लांधकाम अनधिकृत असल्याने निष्काशीत करावे, अशी मागणी ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मागणी केली आहे.
वर्तकनगर हद्दीतील नाक्यावर म्हाडाच्या भुखंडावर लबडे नावाच्या व्यक्तिने जमिनाचा कब्जा करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. त्यातील एका बांधकामामध्ये पत्त्याचा रमी क्लब सुरु असून, तो सध्या विकी सावके व पापा सावके नावाचे दोन बंधू हा क्लब भाड्याने चालवतात. सद्यस्थितीत सदरील भूखंड हा म्हाडाने ठामपाला हस्तांतरीत केलेला असून, त्या भूखंडावर ठामापाने पीपीपी तत्वावर पुर्णबांधणीची योजना सरु केलेली आहे.
योजनेअंतर्गत विविध प्रकल्पबाधीतांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. मात्र, क्लब चालवणाऱ्या व्यक्ती ह्या राजकीय लोकांशी संबंधित असल्यामुळे बळाचा वापर करून बांधकाम निष्काशीत होऊ नये, यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव वाढवत आहेत. तरी क्लब तातडीने बंद करून हे बांधकाम पुर्णपणे निष्कासित करण्याकरिता ठामपा आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देण्यात आले आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आज सदर ठिकाणी जाऊन या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या व सदर क्लब लवकरात लवकर बंद झाला नाही तर उद्यापासून धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.