कल्याणमधील मंगलराघो नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला
- कल्याण पूर्व मंगलराघो नगर परिसरातील धक्कादायक घटना
- चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला, थेट तळमजल्यापर्यंत स्लॅब कोसळला
- सप्तशृंगी असं इमारतीचे नाव
- इमारतीमध्ये काही नागरिक अडकल्याची शक्यता
- अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, बचाव कार्य सुरू
- चार जणांना इमारतीतून रेस्क्यू करत बाहेर काढण्यात यश आले आहे, तर अजूनही काही लोक ढिगार्याखाली अडकल्याची माहिती
- तब्बल दोन तासांपासून अग्निशामक दल, पालिका अधिकारी व पोलिसांकडून रेस्क्यू सुरू
- जितेंद्र गुप्ता, व्यंकट चव्हाण चौथ्या मजल्यावर कोबा करण्याचे काम करत होते. जितेंद्र दुपारी जेवण झाल्यावर बाहेर जेवणासाठी गेला होता. याच दरम्यान स्लॅब कोसळला आणि व्यंकट मात्र या दुर्घटनेत अडकला. तर गेल्या दोन तासांपासून या ठिकाणी रेस्क्यू सुरू असून, आतापर्यंत दोन लहान मुलं एक महिला आणि एक वयोवृद्ध असे चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. तर या इमारतीत अजूनही तीन ते चार जण अडकल्याची माहिती इमारतीतील लोकांनी दिली आहे.