भाजी विक्रेत्या महिलेचा पतीकडूनच खून
भाजी विक्रेत्या महिलेचा पतीकडूनच खून मानेवर कुऱहाड घालून खून सांगली शिंदे मळा कुरणे गल्लीत पत्नीचा डोक्यात कुऱहाड घालून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडली. घरगुती वादातून पतीनेच पत्नीच्या मानेवर कुऱहाडीने हल्ला करीत तिचा खून केला. पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जागीच मृत्यू झालाय. तर पती स्वतः हा पोलीस स्टेशन मध्ये हजर झालाय. मयत अनिता काटकर ही भाजी विक्रीचा व्यवसाय करत होती तर पतीही तिच्यासोबत भाजी विक्री करत होता. आज सकाळी राहत्या घरी पती सीताराम काटकर याने पत्नीच्या मानेवर कुराहाडीने घाव घातला.
या वर्मी घावात अनिताचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला.शिंदे मळा कुरणे गल्लीत घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे. पहाटे साडेपाच्या सुमारासखुनाचा प्रकार घडला तर घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. घरगुती वादातूनच खून झाल्याचं बोललं जातय.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली