एपीएमसी बाजारात फक्त पुढील आठवड्यापर्यंत मिळणार महाराष्ट्रातील हापूस आंबा
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू होती. आता मात्र मे महिना सुरू झाल्याने आंब्याची आवक देखील कमी झाली आहे. तर महाराष्ट्रातील आंब्याचा सीझन संपत आला असून, पुढील आठवड्यापर्यंत हापूस आंब्याची आवक होणार असल्याचं व्यापारी म्हणत आहेत.
कोकणातील हापूस आंब्याची आवक ही मोठ्या प्रमाणात एपीएमसी बाजारात होत होती, मात्र बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला देखील बसला आहे. त्यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच हापूसची आवक कमी झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील हापूसची फक्त शेवटची आवक होणार असून, इतर राज्यातील आंब्यांची आवक सुरू राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली