दलित महासंघाचे वाघाबीळ येथील रास्तारोको स्थगीत
वारणानगर येथे झालेल्या बेकायदेशीर उत्खननाला पाठीशी घालणाऱ्या बांधकाम विभाग व वारणा कालवे विभागाच्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच प्रशासनाकडून आंदोलनाबाबत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याच्या निषेधार्थ आज दलित महासंघाच्या (वायदंडे गट)वतीने राज्याध्यक्ष डॉ.सुधाकर वायदंडे यांनी वाघाबीळ येथे रास्ता रोको व सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार व कोडोली पोलिस ठाण्याचे सहा.पो निरक्षक कैलास कोडग यांनी वारणा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आंदोलकांशी चर्चा घडवून आणली. यावेळी निवासी नायब तहसीलदार,शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक विजय घेरडे, पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहा पो. निरीक्षक संजय बोंबले उपस्थित होते.
यावेळी पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे व युवक जि. कार्याध्यक्ष यांना सकाळी कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
यावेळी दलित महासंघाचे राज्यउपाध्यक्ष पोपटराव लोंढे,प.महा कार्याध्यक्ष सदाभाऊ चांदणे,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे,सांगली जि. निरीक्षक दादासाहेब गायकवाड,जि.संघटक गणेश धनवडे,युवक जि.कार्याध्यक्ष सागर लोंढे,युवक हातकणंगले ता.अध्यक्ष गोरख सावंत,ता.नेते प्रशांत डोईफोडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली