अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचे नुकसान
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कोळगाव परिसरात आज अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी राब राब राबून पिकवलेले अन्नधान्य अवकाळी पावसाने आलेला तोंडी घास हिरावून घेतले आहे.
हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला आहे त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.