मुंबईतल्या भुयारी मार्गानं प्रवास करत असताना भीती किंवा संशय मनात बाळगू नका - अश्विनी भिडे
दि. २६ मे रोजी झालेल्या संततधार पावसामुळे आणि मेट्रो स्थानकाच्या एका प्रवेशद्वाराचे काम सुरु असल्यामुळे वरळी येथील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरले. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कायस्वरुपी यंत्रणा उभारण्यात येत आहे,
अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे. तसेच मुंबईतल्या भुयारी मार्गानं प्रवास करत असताना भीती किंवा संशय मनात बाळगू नका, असे आवाहन अश्विनी भिडे यांनी केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.