LOKSANDESH NEWS
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शोभायात्रेमध्ये विविध ऐतिहासिक देखावे सादर
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून गेल्या 30 ते 35 वर्षांपासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते.
यावर्षीच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आ. संजय गायकवाड हे आहेत. त्या निमित्ताने बुलढाणा शहरात भव्य दिव्य स्वरूपात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, धर्मवीर आखाडा व धर्मवीर युथ फाउंडेशन च्या माध्यमातून साजरी करण्यात आली आहे. 12 मे रोजी शिवशंभो गर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात अभि-अम्मु यांचा शिवगीत, लोकगीत, गोंधळ असा कॉन्सर्ट शो राहील. 13 मे रोजी गितराधाई उत्सवशाही हा कार्यक्रम.तर मध्य रात्री छत्रपती संभाजी महाराज स्मारक, जयस्तंभ चौकात भव्य लेझर लाईट शो आणि 12 वाजता फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली आहे.. आज सायंकाळी शोभायात्रा संगम चौकामधून सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत विविध देखाव्यांचा समावेश करण्यात आला होता आहे. यावेळी शिव भक्त, संभाजी भक्तांच्या गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवप्रेमी मध्ये मोठा उत्साह संचारला होता.