तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आंब्याची बाग सततच्या पावसाने उद्ध्वस्त; वयोवृद्ध महिला शेतकऱ्याने फोडला टाहो

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आंब्याची बाग सततच्या पावसाने उद्ध्वस्त; वयोवृद्ध महिला शेतकऱ्याने फोडला टाहो


 तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आंब्याची बाग सततच्या पावसाने उद्ध्वस्त; वयोवृद्ध महिला शेतकऱ्याने फोडला टाहो


 बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व होत असलेल्या पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडतोय. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने फळ बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद असून या तालुक्यातील फळबागेचे सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील युवा शेतकरी धनंजय गर्जे यांनी दहा एकरवर आंब्याची बाग जोपासली होती. यासाठी तब्बल सात लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसाने फळबागेचे मोठे नुकसान झालंय. बाजारपेठेत आंबा दाखल होण्यापूर्वीच सततच्या पावसाने आंब्याचे नुकसान होऊन फळ गळून पडले आहेत.

दहा एकर बाग जोपासण्यासाठी गर्जे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी मेहनत घेतली होती. दहा एकर मधून 40 टन आंब्याचे उत्पादन होणार होते. मात्र हा आंबा बाजारात जाण्यापूर्वीच हे चित्र पाहायला मिळते आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकाचे डोळ्या देखत नुकसान झालेले पाहून मुक्ताबाई गर्जे यांनी अश्रू आणि टाहो फोडला. मायबाप सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी भावना हे शेतकरी व्यक्त करत आहेत.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.