आधार अपडेट करण्यासाठी नांदेडच्या पोस्ट ऑफिस बाहेर नागरिकांच्या रांगा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आधार अपडेट करण्यासाठी नांदेडच्या पोस्ट ऑफिस बाहेर नागरिकांच्या रांगा

                                                            LOKSANDESH  NEWS 




                   आधार अपडेट करण्यासाठी नांदेडच्या पोस्ट ऑफिस बाहेर नागरिकांच्या रांगा



प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांच्या नांदेडच्या पोस्ट ऑफिस बाहेर रांगाच रांगा लागत आहेत. नांदेड शहरातील अनेक आधार केंद्र बंद असल्याने दररोज पोस्ट ऑफिसच्या बाहेर नागरिकांच्या अशा पद्धतीने रांगा लागत आहेत. आधार अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये एकच आधार केंद्र आहे. या आधार केंद्रावर दररोज फक्त 40 जणांचे आधार अपडेट करण्यात येत आहेत.

 आधार अपडेट करण्यासाठी दररोज या ठिकाणी मध्यरात्रीपासून नागरिक रांगा लावत आहेत. फक्त 40 जणांचे आधार अपडेट होत असल्याने उर्वरित नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. मागील चार ते पाच महिन्यापासून पोस्ट ऑफिसच्या समोर अशा पद्धतीने नागरिकांच्या रांगा लागत आहेत. प्रशासनाने नांदेड शहरातील पडलेली आधार केंद्र चालू करण्यात यावेत. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.