बरडशेवाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिराचे आयोजन
हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा मंडळामध्ये आज महसूल वन विभाग तहसील कार्यालयात हदगाव यांच्या वतीने बरडशेवाळा यथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान कार्यक्रम तहसील कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष तहसीलदार यांनी शेतकरी कामगार, संजय गांधी निराधार लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती सर्वांना तहसीलदार यांनी यांना मिळणाऱ्या शासनामार्फत सर्व सोयी सुविधा याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना सरकारतर्फे जे योजना मिळतात व योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी फारमर आयडी काढून घेण्याचे आवाहन केले. जिवंत सादबारा, फेरफार, तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत करून घेण्यात यावे व गाव रस्ते, पांदन रस्ते, वहिवाट रस्त्यावर ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले त्या शेतकऱ्यांनी रस्ते खुले करून देण्याचे शेतकऱ्यांना आवाहन सुद्धा केले. सरकारच्या सर्व योजना ज्या मिळत असतात त्या योजना गावांमध्येच तलाठी, मंडळ अधिकारी सरपंच, ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.