LOKSANDESH NEWS
अवकाळी पावसामुळे चारापीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत
धुळे तालुक्यासह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने आर्थिक आणि मानसिक धक्का दिला आहे.
धुळ्यातील वरखेडे परिसरात असलेल्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री अचानक आलेल्या वाऱ्यांसह वादळी पावसामुळे शेतकऱ्याने आपल्या जनावरांसाठी लावलेला चारा पीक हे पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून त्यामुळे शेतकरी आता मोठा अडचणीत सापडला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली