राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन सोहळा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन सोहळा...



 लोकसंदेशसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारस मुथा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन सोहळा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळे यांचे भावनिक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि स्पष्ट भूमिका

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर एक भावनिक संदेश शेअर केला. त्यांनी लिहिले होते :
"सहन करायला शिका… आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो. आपण प्रयत्न करत राहायचे. आपल्या बाजू कितीही खरी असली तरीही अन्याय होत असतो. आपण काहीही करू शकत नाही. परिस्थिती आपल्या हातात नसतात… तेव्हा घट्ट व्हायचं, सहन करायचं, कर्तव्य करत राहायचं. आपले संस्कार कधीही विसरायचे नाहीत."
या स्टेटसवर पत्रकारांनी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा माझा वैयक्तिक स्टेटस आहे. मी काही वक्तव्य केलेलं नाही. विमानात बसल्यावर आईने दिलेला सल्ला आठवला, तोच मी लिहिला. एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं गैर नाही प्रत्येकाला अधिकार आहे .”आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या गटांनी वर्धापन दिन साजरा केला. पुढील वर्षी एकत्रित वर्धापन दिन होईल का, असा प्रश्न एक पत्रकारांनी विचारल्यावर सुळे म्हणाल्या, “तुमच्या अपेक्षा असतील, तर त्या माझ्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवा.” तसेच, चार आमदारांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पक्ष एकत्र यावा यासाठी पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ वर्षांच्या वाटचालीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला आहे. या प्रवासात अनेक नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आहे. हे सर्व टीमवर्क आहे, एकट्या व्यक्तीचा प्रवास नाही. आज मला विशेषतः स्व. आर. आर. पाटलांची आठवण येते. अनेक नेते जे पक्षात आहेत किंवा होते, त्यांचं योगदान विसरता कामा नये असाही उल्लेख केला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.