गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे आज दि.9/06/2025 रोजी शालेय प्रवेशोत्सव नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.मोहन वनखंडे (सर ) उपस्थित राहून सरांनी मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थी व पालक यांना सूचना दिल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी शाळेचे समन्वयक संतोष जाधव (सर) ज्ञान प्रबोधनीच्या प्राथमिक विभाग सौ.सविता पाटील ( मॅडम) ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.अमृता शिंदे (मॅडम)
प्रज्ञा प्रबोधिनी प्राथमिक विभाग सौ. कविता सातपुते (मॅडम) प्रज्ञा प्रबोधिनी माध्यमिक विभाग सौ. सुजाता कदम (मॅडम) प्री प्राइमरी विभाग ज्ञान प्रज्ञा सौ.स्वप्नाली मेंढे (मॅडम) तसेच माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षिका व शिक्षक तसेच कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी करिष्मा कांबळे (टीचर )यांनी सूत्रसंचालन केले व चेतन कलगुडगी (सरांनी) या कार्यक्रमाचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.