पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये डॉक्टरची आत्महत्या – तपास सुरू...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये डॉक्टरची आत्महत्या – तपास सुरू...



लोकसंदेशन्यूज पुणे जिल्हा प्रमुख : पारस मुथा

पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये डॉक्टरची आत्महत्या – तपास सुरू...

पुणे रूबी हॉल क्लिनिकमधील रेडिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने रविवारी रात्री ९:३० ते १० च्या दरम्यान आत्महत्या केली. पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून, डॉक्टर गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयात कार्यरत होते.घटनेबाबत घरच्यांनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही. त्यांच्यामते, डॉक्टरने कामाच्या ताणामुळे टोकाचे पाऊल उचलले असावे. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले की सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणाचा थेट उल्लेख नाही.
सुसाईड नोटमध्ये मोबाईल व यूपीआयचे पासवर्ड देण्यात आले असून, "Thanks PM Sir for all" असे नमूद करण्यात आले आहे. 'PM सर' म्हणजेच त्यांचे HOD डॉ. प्रणव महादेवकर असल्याचा अंदाज वर्तवला आहे

डॉ. श्याम व्होरा (Dr. Shyam Vhora) (वय २८) असे या मृत डॉक्टरचे नाव आहे. ते मूळचे गुजरातच्या (Gujarat) भावनगर (Bhavnagar) येथील रहिवासी होते आणि रेडिओलॉजीचे (Radiology) शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. गेल्या एक वर्षापासून ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात (Radiology Diagnosis Department) निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते.
पोलिसांनी HOD ची चौकशी केली असून, त्यांच्या फोनचीही तपासणी केली आहे. डॉक्टरने स्वतः HOD ला "मला सायकोलॉजिस्टची गरज आहे" असा मेसेज पाठवला होता, ज्यावरून मानसिक तणावाचे संकेत मिळत आहेत.

घटनेचा तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही, असे पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले 

 लोकसंदेश न्यूज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.