राष्ट्रवादी अजित पवार गटात कार्यकर्त्यांसोबत प्रवेश घेणार - काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी अजित पवार गटात कार्यकर्त्यांसोबत प्रवेश घेणार - काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा

LOKSANDESH  NEWS





  राष्ट्रवादी अजित पवार गटात कार्यकर्त्यांसोबत प्रवेश घेणार - काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा

 जेवढे ही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. 40 वर्ष पक्षाने आम्हाला भरपूर काही दिलं. मी म्हणेल ती पूर्व दिशा खामगाव मतदार संघात होती. त्यानंतर एखाद्या मोठ्या नेत्याने म्हटलं की, याला तिकीट द्यायचं मी म्हटलं नाही तर ते सुद्धा मान्य झालं. आजपर्यंत मी अल्पसंख्यांक समाजाचा असून, मी पक्षाने मला भरपूर दिलं त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. मात्र आज कार्यकर्त्यांना मोठं करायच आहे. अजित पवार यांचा जो पक्ष आहे शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद तोच विचारसरणीचा आहे. कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे. त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी 40 वर्षापासून माझ्यासोबत तनमन धनाने राहिले, त्यांना मला आज त्याचं भविष्य बघायचं आहे. आणि दादांना भविष्यात मुख्यमंत्री करायचा आहे. त्यामुळे विदर्भात जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत.

काँग्रेस का सोडली यावर :

काँग्रेस कुठे सोडली, मी त्याच विचारसरणीचा आहे. फक्त भारतीय निघून तिथे राष्ट्रवादी आली. जी काँग्रेसची विचारसरणी आहे, तीच दादांच्या पक्षाची विचारसरणी आहे. काँग्रेस कुठे सोडली कोण म्हणतो?दादांचा पक्ष महायुतीमध्ये जाऊन बसला आहे. विचारसरणीवर फरक पडत आहे का? आमचा पाठिंबा आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत की, लालसेपोटी किंवा भीतीपोटी काँग्रेस सोडली आहे यावर :कुठे लालसेपोटी, कुठे आजपर्यंत काय झालं?  माझ्यावर आतापर्यंत कुठलीही क्रिमिनल केस नाही. माझे कुठलेही दोन नंबरचे धंदे नाहीत. मग कसली भीती जर असती तर 11 वर्षे होते. भीतीपोटी ते काही ही कारवाई करू शकले असते. ते मात्र 11 वर्षात ते काहीच कारवाई करू शकले नाही. राणा कधी घाबरणार नाही, हे तुम्हा सर्वांना सुद्धा माहिती आहे.

खामगाव मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांना निमंत्रण राहील. कार्यक्रमांमध्ये हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी आहे. गावात सर्व पुतळ्यांवर पुष्पवृष्टी करण्याच्या पहिले स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीवर पहिले पुष्पवृष्टी करू. व त्यानंतर गावात असणाऱ्या सर्व पुतळ्यांवरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करूया.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली