पावसाळा सुरू झाल्याने नर्सरी व्यवसायाला उत्तम प्रतिसाद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला की नागरिक आंबा, काजूची झाडे लागवड करण्यास सुरुवात करतात. जिल्ह्यात अनेक भागात नर्सरी व्यावसायिक असून, साधारणतः जानेवारी महिन्यापासून आंबा, काजू कलमे तयार करण्यास सुरूवात होते.
ही कलमे उच्च प्रतीची असून कोल्हापूर, चंदगडसह राज्यात अनेक भागातील लोक खरेदीसाठी येतात. यातून स्थानिक व्यावसायिकाला आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. एकंदरीत पावसाळा सुरू झाल्याने सध्या नर्सरी व्यवसाय जोमात असल्याचे दिसून येते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.