गेल्या वीस वर्षात अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी गोंदिया जिल्हा बँक भ्रष्टाचाराने पोखरून, लुटून काढली- नाना पटोले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गेल्या वीस वर्षात अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी गोंदिया जिल्हा बँक भ्रष्टाचाराने पोखरून, लुटून काढली- नाना पटोले

                                                           LOKSANDESH  NEWS




गेल्या वीस वर्षात अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी गोंदिया जिल्हा बँक भ्रष्टाचाराने पोखरून, लुटून काढली- नाना पटोले

आमचे विरोधक भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) मध्ये सध्या तीन तिघाडा आणि काम बिघाडा झालं असच काही दिसून येत आहे. आम्ही मात्र काँग्रेस पक्ष म्हणूनच ही गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक लढत आहोत, निवर्तमान बँकेच्या संचालक मंडळाने मागील वीस वर्षापासून सत्तेत असताना त्यांनी शेतकऱ्यांशी नेहमीच धोका केलेला असल्याचे सातत्याने दिसून येते यांनी शेतकऱ्यांचे सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेअर्स जिल्हा बँकेत येतात ते कोट्यावधी रुपयांचे ते सुद्धा काढून त्यांच्यात भ्रष्टाचार करायचा धंदा सध्याच्या या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळांनी आणि अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी केला आणि जिल्हा बँक भ्रष्टाचाराने पोखरून, लुटून काढली असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचाराकरिता गोंदियात आले असताना आमदार नाना पटोले शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलत होते.




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.