| LOKSANDESH NEWS
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपकेंद्र बीडमध्ये; अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी घेतला आढावा
बीड जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपकेंद्र सुरू केले जाणार आहे. या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत जुलै महिन्यात मराठवाड्यातील बीडमध्ये उपकेंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बीडच्या शेजारील जिल्ह्यातील लाभार्थ्यांना त्यांचे प्रश्न या ठिकाणी येऊन मार्गी लावता येईल. असे नियोजन केल्याचे नरेंद्र पाटील यांनी म्हटले.
तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा आरक्षण प्रश्नी आंदोलन छेडण्याबाबत मुख्यमंत्री त्यांच्या मागण्यावर काम करत असल्याचे पाटील यांनी म्हटले. तर जरांगे पाटील नवी मुंबईत आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी मागणी करण्यात आली नाही, ती देखील पूर्ण केल्याचं सांगितले. SEBC पेक्षा EWS आरक्षण महत्त्वाचे होते. मात्र तो घास हिरावला गेल्याची खंत नरेंद्र पाटील यांनी बोलून दाखवली.