जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र मंडळ वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या वतीने आज सकाळी बुलढाणा शहरातून पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी हिरवी झेंडी दाखविली. स्थानिक गांधी भवन येथून या पर्यावरण सायकल रॅली ची सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीने शहराच्या मुख्य चौकातून मार्गक्रमण केले, या पर्यावरण सायकल रॅलीच्या माध्यमातून शहरवासीयांना पर्यावरण संरक्षणाचा घेऊ संकल्प असा संदेश देण्यात आला. या रॅलीमध्ये असंख्य अधिकारी, पर्यावरण मित्र मंडळ उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.