सांगलीमध्ये कुणा खुनाचं सत्र थांबता थांबेना..
सांगलीमध्ये कुणा खुनाचं सत्र थांबता थांबेना.. सांगलीमध्ये खुनाचे प्रकार वाढले असून आज सकाळी घाडगे पाटील शोरूम समोर 100 फुटी रोडवर एका भाजी विक्रेत्याचा खून करण्यात आला... ही घटना सकाळी सहा वाजता घडली... शंभर फुटी घाडगे पाटील जवळ सकाळी होलसेल भाजी बाजार भरतो ...यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची होलसेल खरेदी विक्री ही सकाळी पहाटे चार वाजल्यापासूनच सुरू असते.. यामध्ये या बाजारात एक भाजीविक्रेता महेश कांबळे नामक हा कोथिंबीर विक्रीचा काम करत होता.. याचा सकाळी काही अज्ञातांनी डोक्यात दगड व चाकूने वार करत त्याचा खून केला व ते पसार झाले या महेश कांबळे बाबत असं कळून येते की ,याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती व तो एका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगून आला होता असे समजून येते , यातील अज्ञात आरोपींचा शोध सांगली शहर पोलीस घेत आहेत..
हा खून प्रकार समजल्यानंतर तातडीने सांगली शहर पोलीस हजर झाले.. यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.