वनमंत्री नाईक यांची घोषणा 'वन विभागात महिला नेतृत्व वाढवणार'
चंद्रपूर येथील वन अकादमीत 'वनशक्ती' कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे तसेच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात वन्यजीव-मानव संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याबाबत वनमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. वनपाल ते डीएफओ स्तरातील अधिकाऱ्यांना अत्याधुनिक वाहने व बचावासाठी शस्त्रसज्जता पुरविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सशक्त सहभागावर भर देताना वनमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले की वन विभागातील पुढील भरती प्रक्रियेत महिलांना ५१ टक्के प्राधान्य दिले जाणार आहे. महिलांचा वन विभागात वाढता सहभाग हा विभागाच्या सर्वांगीण बळकटीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे वनमंत्री नाईक यांनी म्हटले आहे.
'वनशक्ती' कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांचा महत्वाचा सुझाव चंद्रपूर येथे पार पडलेल्या 'वनशक्ती' कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी वनसंवर्धनात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महत्वाचा प्रस्ताव मांडला.त्यांनी पोलीस पाटीलच्या धर्तीवर 'वन पाटील' व 'वन पाटलीन' ही संकल्पना राबवण्याचा सुझाव यावेळी वनमंत्री यांना दिली असल्याची माहिती दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.