पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर भर दिवसा चोरी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर भर दिवसा चोरी



 पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर भर दिवसा चोरी


 सध्या धुळे शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे आता तर चोरट्यांनी हद्दच केली आहे. धुळे शहरातील जुने धुळे भागात असलेल्या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच भर दिवसा घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. कैलास देवरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा लग्न निमित्ताने न्याहली, नंदुरबार येथे गेला असतानाच चोरट्यांनी संधीचा फायदा घेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. 

धुळे शहरातील गजबजलेला परिसर म्हणून जुन्या धुळ्याची ओळख आहे आणि अशातच या गजबजलेल्या परिसरामध्ये आझाद नगर पोलीस स्टेशनची एक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे आणि या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच कैलास देवरे यांचे घर असून काल दुपारच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचे घर फोडून लाखो रुपयांचे सोने-चांदी आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर चोरटा हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच भर दिवसा जर घरफोडी होत असेल तर पोलीस प्रशासन करते तरी काय? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या चोरट्याला जेरबंद करून आमचे दागिने आणि पैसे आम्हाला परत करावे अशी मागणी आता होत आहे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.