जयगड जवळ धावत्या ट्रकला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जयगड जवळ धावत्या ट्रकला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही



जयगड जवळ धावत्या ट्रकला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही


जयगड मधील जांभारी फाटा येथे सैतवडे ते खंडाळा मार्गावर एका धावत्या आयशर ट्रकला अचानक मध्यरात्री आग लागली. यामुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. मुंबई /सांगली.