महानगरपालिका निवडणुका संदर्भात आत्ता तरी माहिती नाही - आयुक्त नवल किशोर राम
- माझ्या स्वतःचा काही अजेंडा नसेल, शहरातील लोकांचा जो अजेंडा असेल त्यावर मी काम करणार
- शहरातील बेसिक abilities वर काम करणार
- पुण्यातील समस्यांची मला जाणीव आहे
- अडीच वर्षे पुण्यात कलेक्टर म्हणून पण मी काम पाहिल आहे
- महापालिका प्रशासन म्हणून अजून चांगलं काम करण्याची गरज
- प्रशासकीय यंत्र यंत्रणेमध्ये जास्तीत जास्त डिसिप्लिन कसे आणता येईल, यावर काम करणार
- पालिका प्रशासनाच्या कामांमध्ये पारदर्शकता कशी वाढवता येईल, नागरिकांसाठी असलेल्या सेवा सुलभ कशाकरता येतील. या सगळ्यावर काम करणार
- पालिकेचे बरेच प्रोजेक्ट पेंडिंग आहेत, त्यामध्ये मेट्रो असेल, मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प, असे काही मोठे मोठे प्रकल्प आहेत, जे वेळेवर पूर्ण होणे गरजेचे आहे
- नागरिकांच्या रोजच्या प्रश्नांवर कसं काम करता येईल, या सगळ्या विषयांवर फोकस जास्त राहणार
ON पावसाळी काम
- पावसाळी काम वेळेवर करणं गरजेचं होतं
- यावेळी पाऊस लवकर पडला, अन्यथा मे मध्ये पाऊस होत नाही
- वेळ आता कमी आहे, मात्र मान्सूनची तयारी आम्हाला करावीच लागेल
- वेळेमध्ये तयारी झाली नाही, मात्र आता जो वेळ आहे त्यामध्ये आम्ही तयारी नक्कीच करू
ON अतिक्रमण
- अतिक्रमण हा एक मोठा प्रश्न आहे
- अतिक्रमणाचा सविस्तर आढावा घेऊन, त्यामध्ये काहीतरी कार्य योजना मी स्वतः तयार करणार
- अतिक्रमण काढणे म्हणजे लोकांना शहरापासून दूर करणे, हा आमचा उद्देश नाही
- डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे आहे, त्याप्रमाणे काम झालेच पाहिजे हाच आमचा उद्देश
- काही देशांमध्ये अतिक्रमण काय आहे, हे लोकांना माहीतच नसतं
- डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये प्रशासक पातळीवर दुर्लक्ष होतं, त्याचा हा परिणाम आहे
ON महानगरपालिका निवडूका
- महानगरपालिका निवडणुका संदर्भात आत्ता तरी माहिती नाही
- शासनाचा आदेश देखील अजून आलेला नाही
- माझ्याकडे निवडणुका करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे जे काही समोर असेल ते आम्ही बघू
- बऱ्याच ठिकाणी निवडणुकीचे काम केलं आहे, त्यामुळे अडचण येणार नाही
ON प्रभाग रचना
- प्रभाग रचनेबाबतीत स्पष्ट नियम आहेत
- आपण रचना तयार करतो लोकांना दाखवतो आक्षेप पण घेतो
- जो काही योग्य निर्णय असेल, तो घेतो त्यामध्ये काही समस्या नाही
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.