महिलेच्या प्रसूती शस्त्रक्रिया दरम्यान पोटात राहाला कापडाचा तुकडा, डॉक्टर विरोधात महिलेच्या पतीची पोलिसात तक्रार
रिसोड शहरात मागील वर्षी एका खाजगी रुग्णालयात सुरेखा काबरा या महिलेची प्रसूती दरम्यान सिजर झाले होते, मात्र एक वर्षापासून रुग्ण महिलेचे सतत पोट दुखत असल्याने, त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे तपासणी केली असता पोटामध्ये मॉबच्या कापडाचा तुकडा असल्याचे समजले, छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पुन्हा पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील कापडाचा तुकडा काढण्यात आला,
एक वर्षाआधी या महिलेची रिसोड येथील खाजगी रुग्णालयात प्रसूती झाली होती त्या रुग्णल्याचे डॉ अमोल नरवाडे यांनी चुकीच्या उपचार केले असल्याचा आरोप महिलेचे पती गणेश काबरा यांनी केला असून यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे. महिलेच्या पतीने यासंदर्भात पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.