इराणी खजूराची लागवड करत शेतकरी घेत आहे लाखो रुपयांचे उत्पन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

इराणी खजूराची लागवड करत शेतकरी घेत आहे लाखो रुपयांचे उत्पन्न

 


इराणी खजूराची लागवड करत शेतकरी घेत आहे लाखो रुपयांचे उत्पन्न

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडी गावातील शेतकरी जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी 2020 साली आपल्या 3 एकर क्षेत्रफळात बारही जातीच्या इराणी खजूराची लागवड केली, कारण सततची नापिकी ओला,कोरडा दुष्काळी परस्थितीला शेतकरी त्रस्त आहेत त्यामुळेच काहीशी आगळी वेगळी शेती करावी या दूरदृष्टीने शेतकरी जगदीश शेंडगे यांनी इराणी खजूराची लागवड केली, सुरुवातीला गुजरात हून त्यांनी ही रोपे मागवलीय यामध्ये  पिवळ्या रंगाच्या गोड आणि मलाईदार चवीच्या खजूराला बाजारात चांगलीच मागणी आहे  फायबर व अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध अशी ही खजूर आहेत. या खजूराची विक्री ते त्यांच्या शेतातील स्टॉलवर प्रतिकिलो 200 रुपयांना करतात,ज्यामुळे प्रति एकर 8 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळते.अशी प्रत्येक वर्षी या खजूराचे दुप्पट उत्पन्न शेंडगे हे घेत आहेत.

शेंडगे यांनी गुजरातमधील नर्सरीतून 180 खजूराची रोपे प्रति रोप 4000 रुपयांना खरेदी केली होती,ज्यासाठी एकूण 7.2 लाख रुपये त्यांना खर्च आला जमीन तयार करणे, गायीचे शेणखत घालणे आणि खड्डे खोदणे यांसह एकूण 9 लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी सुरवातीला केली.

प्रत्येक रोप 25x25 फूट अंतरावर लावले गेलेत..ही रोपे टिश्यू कल्चरद्वारे विकसित केली गेली असून, ती चौथ्या वर्षापासून फळ देण्यास सुरुवात करतात आणि 70 वर्षांपर्यंत उत्पादन देऊ शकतात असं शेतकरी शेंडगे यांनी म्हटलंय.

खजूराच्या झाडांना कमी पाणी आणि फक्त गायीचे शेणखत लागते. शेंडगे यांनी ड्रिप सिंचन प्रणाली बसवली आहे, ज्यामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते.ते खजूराच्या झाडांमध्ये सोयाबीन आणि हिवाळ्यात गहू अशी आंतरपीक पद्धती वापरतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि एक्स्ट्रा इन्कम देखील मिळते.

खजूराच्या झाडांना मॅन्युअल परागीकरणाची गरज असते, कारण नैसर्गिक परागीकरण प्रभावी नसते. 100 मादी झाडांसाठी एक नर झाड पुरेसे असते,शेंडगे यांच्या अनुभवानुसार, खजूराची शेती कमी पाणी, कमी खर्च आणि उच्च उत्पन्न देणारी आहे, जी दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.