सांगली भेळ विक्रेते बेकायदेशीर अतिक्रमण सांगली जिल्हाधिकारी यांची यशस्वीरित्या शिष्टाई ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली भेळ विक्रेते बेकायदेशीर अतिक्रमण सांगली जिल्हाधिकारी यांची यशस्वीरित्या शिष्टाई ...





लोकसंदेश
सांगली जिल्हा प्रतिनिधी
अभिजीत शिंदे

सांगली भेळ विक्रेते बेकायदेशीर अतिक्रमण सांगली जिल्हाधिकारी यांची यशस्वीरित्या शिष्टाई 



गेले चार दिवस जनसेवा फळे भाजीपाला व खाद्यपद विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर तिच्या नेतृत्वाखाली सुरू असणारे प्रतापसिंह उद्यान येथील आंदोलन...  आणि महापालिकेची कारवाई थांबली....  



सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेब यांच्याकडे काल निवेदन देण्यात आले होते व आमची कैफियत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मांडली होती त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातल्या फेरीवाला समितीचे काम पाहणाऱ्या उपायुक्त स्मृति पाटील यांच्याशी आज सकाळी त्यांच्या जालनामध्ये बैठक झाली त्यांच्यासमोर अडीअडचणी मांडल्या प्रश्न मांडले त्यातून आयुक्तांच्या समोर झालेल्या आणि दिल्या गेलेल्या माहितीनुसार आयुक्तांच्या शंकांचे निरसन झाले लोकांच्या तक्रारी येणार नाही त्याची दक्षता घेण्याचे ठरले.


त्याचबरोबर या परिसरामध्ये होणारा कचरा आणि कटिंग ग्राहकांचं वापरलेलं जे वेस्टेज आहे ते घंटागाडी च्या माध्यमातून आणि या रस्त्यावर कुठलंही वाहतुकीचे अडथळे येणार नाहीत त्याचबरोबर फेरीवाल्यांनी स्वच्छतेचे पालन करावं अशी भूमिका प्रशासनाने ठेवली सांगलीच्या तरुण भारत स्टेडियम म्हणजेच माहेश्वरी चौक ते भावे नाट्य मंदिर हा मार्ग लोकांच्यासाठी खुला करावा आणि छत्रपती संभाजी महाराज मार्ग वासुदेव बळवंत फडके चौक ते एसटी स्टँड हा एकतर्फी मार्ग आहे दुतर्फी मार्ग वाहतूक ही भावे नाट्यमंदिर नवसंदेश च्या बोळातून फिरवावी जी पहिल्यापासून ची नैसर्गिक वाहतूक आहे ती त्यासाठी मा जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस खात्याला आणि वाहतूक नियंत्रण कक्षाला सूचना देण्याच  सांगितले

 या आंदोलनामध्ये फेरीवाला संघटनेचे सदस्य कैस अलगुर रेखाताई पाटील बेबीताई मुल्ला लताताई दुधाळ सादिक बागवान माजी सदस्य संदीप भाऊ पाटील गजानन बन्णे मॉन्टी तिवडे सॅमसंग तिवढे आर्किटेक रवींद्र चव्हाण जिल्हा सुधार समितीचे तानाजीराव रुईकर माजी नगरसेवक संतोष देवळेकर संचालक प्रशांत शिकलगार भोसले संभाजी बन्णे सागर बन्णे प्रतापसिंह उद्यानातील विक्रेते महेश शेट्टी शुभम बन्णे शेखर कांबळे रवी भाऊ माने दीपक ताटे मोहसीन नकाशे आदी विक्रेत्यांनी भाग घेतला...! 

या आंदोलनासाठी सांगलीतील सर्व वृत्तपत्रांनी न्यूज चैनल नी आणि वेब पोर्टलने चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली ज्या ज्या संस्था संघटना आणि वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळींनी फेरीवाल्यांच्या पाठीशी सांगलीकरांच्या अस्मितेच्या प्रश्नाबरोबर ठामपणे भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचेही आभार.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.