वाई प्रतिनिधी ओंकार पोतदार
आरोपी अनिकेत उर्फ बंटी जाधव यास
( interim bail ) जामिन मंजूर
दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी भुईंज तसेच वाई येथील काही युवकांनी संगनमत करुन मयत इसम नामे ओंकार चव्हाण यास जीवे ठार मारुन त्याची बॉडी भुईंज येथील स्मशानभूमीमध्ये जाळून टाकून पुरावे नष्ट केल्याचे आरोप या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींवर होते. सदर घटनेबाबत भुईंज पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर जानेवारी तसेच फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये संशयित आरोपी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव सह एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली होती. तदनंतर सदर प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( MCOCA ) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये अटक असलेला आरोपी क्रमांक १ म्हणजेच अनिकेत उर्फ बंटी जाधव रा. भुईंज याने मे. सत्र न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता.
अर्जदार / संशयित आरोपी नामे बंटी जाधव हा गुन्हा घड़ताना घटनास्थळी हजर असल्याबाबत व आरोपी बंटी जाधव याच्यावर 15 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याबाबत आरोप त्याच्यावर होते. परंतु सदर संशयित आरोपीने नियमित जामिन अर्ज दाखल केला नसून त्याच्या वडिलांच्या व स्वतःच्या वैद्यकीय कारणास्तव मे. सत्र न्यायालयासमोर ( interim bail ) अंतरिम जामिन अर्ज दाखल केला आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला , तसेच interim Bail संदर्भात इतर प्रकरणातील मे. सर्वोच्च न्यायालयाचे व मे. उच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडे(केस लॉ) आरोपीच्या वकिलांमार्फत मे. न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले.आरोपी नामे अनिकेत उर्फ बंटी जाधव याच्या वतीने करण्यात आलेला सर्व युक्तिवाद ग्राह्य धरुनमे. न्यायालयाने काही अटी व शर्तींवर आरोपीस अंतरिम जामीन मंजूर केला असून संशयित आरोपी नामे अनिकेत बंटी जाधव याच्यावतीने ॲड. प्रथमेश अनिल बनकर, ॲड. प्रध्युन्य विजय गाढवे, ॲड. गणेश इथापे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.