निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणीकामी सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकृती सुरू राहणार...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणीकामी सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकृती सुरू राहणार...


निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणीकामी

सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकृती सुरू राहणार...

लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगली, दि. 17 : महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राखीव प्रवर्गावर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारास/अर्जदारास जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करण्याकरिता गैरसोय होऊ नये, याकरिता दि. 25 डिसेंबर 2025 (गुरुवार- नाताळ सुट्टी) दि. 27 डिसेंबर 2025 (शनिवार) व दि. 28 डिसेंबर 2025 (रविवार) या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही केवळ निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.



प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आला आहे. राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करणे आवश्यक असते. सदर सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025-26 मध्ये नामनिर्देशनपत्र अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख दि. 30 डिसेंबर 2025 रोजीची आहे. त्यासाठी वरीलप्रमाणे नमूद शासकीय सुट्टीच्या दिवशी केवळ निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरू ठेवण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

 

अर्जदार/ उमेदवार यांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज https://ccvis.barti.in या संकेतस्थळावर भरून निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचे शिफारस पत्र, 15 ए फार्मवर निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचा सही, शिक्का, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत व ऑनलाईन अर्ज कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह समितीकडे सादर करावे. अर्जदार यांनी अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.


Tags