लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी :मलिक शेख.. मुंबई
बांगलादेशात ढाका येथे हिंदू तरुणाला झाडावर लटकवून जाळून मारल्याबद्दल त्याचा तीव्र निषेध करत दलित सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष टिपू पटवेकर व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अस्मा वसीम शेख यांनी संयुक्त निवेदन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना दिले..-
बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदुंवर होणारे हत्या व अत्याचार तात्काळ रोखणे बाबत अमानवीय कृत्ये करून दररोज निष्पाप हिंदू धर्मीय यांच्यावर होणारे हिंसक अत्याचार मानवतेला काळीमा फासणारे असून हिंदूंच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे आहे. ढाका बांगला देशातील मयमनसिंह जिल्हातील निष्पाप हिंदू युवक दिपू चंद्रदास याची निर्घणपणे हत्या करून त्याचा मृतदेह झाडावर लटकावून जाळण्याचा जो अमानवीय कृत्य हे अत्यंत चीड आणणारा आहे. या सर्व हिंसक व संतापजनक गोष्टींचा महाराष्ट्र दलित पँथर सेना कडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बेकायदेशीर घुसखोरी करून रहाणाऱ्या बांगलादेशी यांचा तत्काळ शोध घेऊन त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांची हकाल पट्टी करावी हि विनंती आज
टिपुभाई पटवेगार, राष्ट्रीय अध्यक्ष, व
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ. आस्मा वसीम शेख.. यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.


