शेतकऱ्यांना साखर कारखानदार ,दूध सम्राट ,अडत दुकानदार, दलाल, शासकीय यंत्रणा यासह सर्वच जण लुटत आहेत, त्यामुळेच शेतकऱ्यांनी लुटणाऱ्या व्यवस्थे विरोधात बंड करायला हवे, ; जिल्हाध्यक्ष महेश खराडे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना साखर कारखानदार ,दूध सम्राट ,अडत दुकानदार, दलाल, शासकीय यंत्रणा यासह सर्वच जण लुटत आहेत, त्यामुळेच शेतकऱ्यांनी लुटणाऱ्या व्यवस्थे विरोधात बंड करायला हवे, ; जिल्हाध्यक्ष महेश खराडे
SANGLI
लोकसंदेश विटा प्रतिनिधी

शेतकऱ्यांना साखर कारखानदार ,दूध सम्राट ,अडत दुकानदार, दलाल, शासकीय यंत्रणा यासह सर्वच जण लुटत आहेत, शेतकऱ्यांना न लुटणारा तो आळशी अशी सध्याची अवस्था आहे त्यामुळे च शेतकऱ्यांनी लुटणाऱ्या व्यवस्थे विरोधात बंड करायला हवे, असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले
खानापूर तालुक्यातील घानवड व वेजेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने तालुकाध्यक्ष तानाजी धनवडे , युवा आघाडी अध्यक्ष सचिन महाडिक उपस्थित होते यावेळी स्वाभिमानी पक्ष खानापूर तालुका अध्यक्ष पदी अमित रवताळे यांची तर घानवड शाखा अध्यक्षपदी बबन सावंत व वेजेगाव अध्यक्ष पदी नामदेव लोखंडे यांची निवड करण्यात आलीखराडे म्हणाले ,उस उत्पादक शेतकऱ्यांना आज जो उसाचा दर मिळतोय तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच मिळतोय, त्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गेली ३० वर्षे संघर्ष सुरू आहे त्यासाठी आमचे अनेक कार्यकर्ते शहीद झाले आहेत अनेकांनी तुरुंगवास भोगला आहे अनेकांनी लाठ्या काठ्या खाल्या आहेत त्यामुळे 300 रुप्यावरून 3000 दर करण्यात आम्हाला यश आले पण त्याची जाणीव शेतकऱ्यांना नाही याची आम्हाला खंत वर्थ
वाटते आज दराच्या लढाईबरोबरच वजनातील कातामारी विरोधात आमचा संघर्ष सुरू आहे दीड ते दोन टन वजनाचा काटा मारला जातो शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान त्यामुळे होत आहे ही चोरी दिवसा ढवळ्या सुरू आहे शेतकरी ते मुकात पणे सहन करत आहे कारखानदार दरोडा घालतच आहेत आता तोडणी मजूर ही दरोडा घालायला लागले आहेत मजूर म्हणून आलेली माणसे ,जगायला आलेली माणसेही शेतकऱ्यांना लुटायला लागली याला कारण शेतकरी संघटित नाही त्याला सर्वजण लुटत आहेत मग आपण का लुटू नये अशी त्याची भावना झाली आहे हे सर्व जन लुटत असताना शेतकरी त्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही आम्ही आवाज उठवतोय तर आम्हाला शेतकरी साथ देत नाही कारण शेतकरी प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातून बघतो आहे आम्ही भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस वाले नाही मग यांच्या मागे कशाला जायचे आपल्या नेत्याला काय वाटेल? असा विचार करतात पण यात शेतकऱ्याचे च नुकसान होते याचा विचार शेतकरी करायला तयार नाही राजकारणासाठी शेतकरी स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेत आहे हे वाइट आहे अर्थकारण आणि राजकारण या दोन भिन्न बाबी आहेत शेतकऱ्यांनी अर्थकारणाला महत्व दिले पाहिजे जिथे आपले आर्थिक हित होणार आहे तिथे तरी किमान संघतनेबरोबर आले पाहिजे आमचा प्रत्येक लढा शेतकऱ्याच्या आर्थिक फायद्याचा आहे ऊस दराची, दूध दराची लढाई शेतकऱ्याचे उत्पननवाढ करणारी आहे हमी भावाची लढाई ही शेतकऱ्याच्या आर्थिक फायद्याची आहे वजनातील काटा मारी थांबली तर शेतकऱ्याचा फायदा होईल, तोडिसाठी तर शेतकरी दोनदा पैसे देतो एकाच कामासाठी दोनदा पैसे देणारा जगात शेतकरी हा एकमेव घटक आहे तोडीचे पैसे कारखाने उस बिळातून कपात करून घेतातच त्याच तोडीसाठी मजुरालाही पैसे मोजतात म्हणजे एकाच कामासाठी दोनदा पैसे शेतकरी देतो त्या विरोधात आम्ही आवाज उठवातोय संघर्ष करतोय पण शेतकरी आम्हाला साथ देत नाहीत ही शोकांतिका आहे तलाट्यापासून ,जिल्हाधिकारी पर्यंत, दलाला पासून साखर सम्राटा पर्यंत लुटणारी व्यवस्था तयार झाली आहे ही व्यवस्था मोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आमच्या बरोबर संघटित होवून बंड करायला सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले वेजे गाव सचिव शांताराम देवकर खजिनदार सतीश देवकर घानवड उपाध्यक्ष सुभाष होन राव कार्याध्यक्ष सागर सावंत प्रवक्ते विशाल सावंत सचिव निलेश सावंत यांची निवड करण्यात आली यावेळी महादेव पवार धोडिराम पाटील विजय रेंदाळकर निशिकांत पोतदार हणमंत पाटील प्रदीप लाड महेश जगताप संदीप शीरोटे उद्धव रवताले नारायण सावंतअनिकेत सावंत संजय सावंत प्रशांत सावंत रमेश सावंत अशोक सावंत श्रीधर सावंत भगवान सावंत अनिल सावंत किशोर सावंत अमोल सावंत दिपक सावंत प्रशांत सावंत अवधूत सावंत प्रभाकर सावंत हमणंत देवकर गुरूनाथ देवकर सिध्दानाथ देवकर बापुसो गुरव मारूती जाधव किशोर गुरव पांडुरंग फाळके वैभव देवकर यशवंत देवकर शातांराम देवकर आण्णासो देवकर लक्ष्मण देवकर प्रशांत माने हणमंत मोहिते प्रशांत देशमुख शिवाजीराजे पवार, एकनाथ पवार, शिवाजी भोसले, सुभाष गायकवाड आदिसह उपस्थित होते

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली