SATARA : किसन वीर आबा कुशल संघटक उत्तम प्रशासन आणि दूरदृष्टी असणारे धुर्ंधर नेते होते, असे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष मा. लालासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA : किसन वीर आबा कुशल संघटक उत्तम प्रशासन आणि दूरदृष्टी असणारे धुर्ंधर नेते होते, असे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष मा. लालासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले



SATARA
लोकसंदेश संभाजी गोसावी प्रतिनिधी,कोरेगांव.

तालुक्यांतील करंजखोप मध्ये दिनांक १९ ऑगस्ट रोजीझालेल्या कार्यक्रमात किसन वीर आबा कुशल संघटक उत्तम प्रशासन आणि दूरदृष्टी असणारे धुर्ंधर नेते होते, असे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष मा. लालासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

करंजखोप, ता. कोरेगांव येथे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने देशभक्त.किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची 117 वी. जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांत ते बोलत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक शिवाजीराव आप्पा धुमाळ होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.रामभाऊ लेंभे, उद्योजक राजेंद्र काका भोसले, सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र वीर, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मा.मंगेश दादा धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बापू कदम.शांताराम दोरके, धनंजय धुमाळ, संग्राम सोळसकर, प्रमोद क्ष्रीरसागर, सचिन पोळ, सुनील भोसले, संजय कर्पे, भरत लोकरे,नाजिम इनामदार, जितेंद्र दादा जगताप, सरपंच लालासो नेवसे, सुनील चव्हाण, सोसायटीचे चेअरमन  शामराव शिंदे सर,  प्रकाश बाबर, सोपान नेवसे,  किशोर भोसले उपसरपंच.       वैशाली धुमाळ, संदीप धुमाळ, आनंदराव शिंदे , राजेंद्र शिंदे,  रत्नंसिह  धुमाळ आदी उपस्थित होते.     


            शैलेंद्र वीर म्हणाले, "आबासाहेब वीर हे देश प्रेमाने भारावलेले व्यक्तिमत्व होते. आबा नैतिक मूल्यांना फार मानत होते . रामभाऊ लेंभे म्हणाले, "आबांनी लोकप्रतिनिधित्वाची पदे मोठ्या जबाबदारीने भूषवली शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेण्यास सज्ज असलेली सातारा जिल्हा बँक यासारख्या अनेक संस्था सुरू केल्या.     


        मंगेश धुमाळ," म्हणाले," आबासाहेब वीर हे एक थोर पुरुष होते. भारताच्या स्वातंत्र्याकरिता आबांनी कष्ट सोसले. त्यांचे कार्य बहुमोल असे होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार,   माजी सैनिक, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी , महिला बचत गट, गुणवंत विद्यार्थी, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनसिंग सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धवदादा कर्णे यांनी केले.आभार संदीप धुमाळ यांनी मानले, यावेळी शिवाजीराव पिसाळ,           बजरंग धुमाळ, सावंत गुरुजी, महेश धुमाळ, अरविंद शिंदे.   दत्तात्रय कर्णे,   प्रमोद  सोनवणे ,  सुभाष धुमाळ, जगन्नाथ राजे , दत्तात्रय भोसले, अरुण जायकर, परदेशी सर,   नंदकुमार महामुनी,  प्रतिक कदम, सुनील वाघ ,   संभाजी गोसावी,  सुनील चव्हाण.अभिजीत शिंदे,   संतोष धुमाळ, आदी कार्यकर्ते,ग्रामस्थ, उपस्थित होते.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली