SANGLI : सांगली: पॅचवर्कमध्ये कागदावरच्या रस्त्यावरून भ्रष्टाचार, विनाकारण पाणीपट्टी आकारणीवरून महापालिका सभेत दंगल...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : सांगली: पॅचवर्कमध्ये कागदावरच्या रस्त्यावरून भ्रष्टाचार, विनाकारण पाणीपट्टी आकारणीवरून महापालिका सभेत दंगल...SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

सांगली: पॅचवर्कमध्ये कागदावरच्या रस्त्यावरून भ्रष्टाचार, विनाकारण पाणीपट्टी आकारणीवरून महापालिकासभेत दंगल...

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या हद्दीत पंचवर्कच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने व विनाकारण मोकळ्या प्लॉट धारकांना पाणीपट्टी आकारल्यावरून आजच्या महापालिकेच्या सभेत प्रचंड गदारोळ झाला.
या भ्रष्टाचाराला सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी मुरमाच्या कामात घोटाळा झाल्याचे मान्य करून भ्रष्टाचाराच्या आरोपांना दुजोरा दिला आहे.


महापालिकेची महासभा महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगरसेवक अभिजीत भोसले यांनी गुंठेवारी व उपनगरातील रस्त्यांवर ठकेदार पॅचवर्कचे काम करत नसल्याचे व गणपती उत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना विसर्जन खड्डयातूनच करायचे का? असा सवाल करत प्रशासनाला धारेवर धरले.

विवेक कांबळे यांनी तर मिरजेतील रस्त्यावरची पंचवर्क धुवून गेले आहेत ठेकेदाराने मिरजेत पंचवर्कच्या कामात खडीकरण न करता मुरमाने खडड्डे मुजवले असून ठेकेदार काम करत नसल्याचे सांगीतले.

संजय मेंढे यांनी गणेश विसर्जन जवळ आले तरी रस्त्यांचे पंचर्वक झाले नाही. लवकरच खड्डे मुजवणे आवश्यक असून यासाठी यंत्रणा वाढवण्यास सांगीतले.

शहर अभियंता संजय देसाई यांनी पावसामुळे खडीकरण व डांबरीकण होत नाही त्यामुळे मुरूम टाकून पॅचवर्क होत असल्याचे सांगताच सर्वच सदस्यांनी आक्षेप घेतला. 

पाऊस दोन दिवस सुरु आहे त्याच्या आधी काय केले? असा सवाल केला. विष्णू माने, शेडजी मोहिते, विजय घाडगे यांनी कुपवाडमध्ये मुरुमीकरण, पंचवर्कची कामे होत नसल्याचे सांगत अधिकान्यांना धारेवर धरले..


सांगलीतील भटक्या व हिंस्र कुत्र्यानी वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांवर ,बालकांवर हल्ला,
व जनावरांच्यावर हल्ला करून फाडून खाल्लेले आहेत या विषयी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी प्रशासनास जाब विचारला...


स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये एक लाख झेंडे पुरवणाऱ्या ठेकेदाराने वेळेत झेंडे न पुरवल्याने व महापालिकेत पुरवठाधारक कोणत्या पक्षाचा आहे, या विषयावर भाजप व इतर पक्षात मोठा गदारोळ झाला

            
             ``नेमिचे येतो पावसाळा '"

 या उक्तीप्रमाणे महापालिका प्रशासनाचे काम चालू आहे ...पावसाळा सुरु आहे ,सांगलीचे आराध्य दैवत गणपतीची प्रतिष्ठापना करायची आहे, हे सर्व माहीत असताना प्रशासन व अधिकारी कोणतेही काम योग्य वेळी करत नसल्याचे दिसून येत आहे, ``बैल गेला आणि झोपा केला' असा काहीसा प्रकार महापालिकेत सुरू आहे, सांगलीतील खड्ड्यांच्या विषयी नागरिकांची चीड प्रशासनाला दिसून येत नसावी...


त्यात कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून मोकळ्या प्लॉट धारकांना पाणीपट्टीची नोंदणी करून त्या वसुलीची कल्पना या अतिशहाण्या अधिकाऱ्याकडून  सांगलीकरावर लादली गेली होती.....

महापालिकेमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचा प्रशासनाचा व नगरसेवकांचा वाचक राहिलेला दिसत नाही
काही नगरसेवक तर पांढरे कपडे घालून चमकोगिरी केल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही..त्यांना नागरिकांच्या प्रश्नाचे काही देणे घेणे नाही..``लोकसंदेश न्यूज मीडिया " ने महापालिका प्रशासन डोक्यावर पडले आहे का ?? 

https://www.loksandeshnews.com/2022/08/sangli_7.html?m=1

असा प्रश्न करत प्रशासनाला निरंतर निरर्थक पाणीपट्टी, कुत्र्यांचा वावर, या विषयावर जाग आणली होती त्या अनुषंगाने आज मोकळ्या प्लॉटवरील पाणीपट्टी कमी करण्याचा आदेश, व कुत्र्यांची नसबंदी करण्याचा अजब फतवा आयुक्तांनी दिलेला आहे.

 आम्ही आयुक्तसाहेबांना हे सांगू इच्छितो की, आम्ही मागणी केली होती की कुत्र्यांसाठी 20 भर गुंठ्याचा प्लॉट घेऊन कुत्र्यांना बंदोबस्त करून नागरिकांना मोकळे फिरण्याची सुविधा महापालिका कडून करून देण्यात यावी ....परंतु याविषयी आयुक्त साहेब काही बोलायला तयार नाहीत.....

https://www.loksandeshnews.com/2022/07/blog-post_57.html

सांगलीतील कुत्र्यांचा विषय हा फार गंभीर झालेला आहे... पण एवढं गांभीर्य आयुक्त ,प्रशासन आणि नगरसेवकांनी घेतलेल दिसत नाही..

वरील सर्व प्रश्न सांगली महापालिका अखत्यारित नसल्यामुळे आम्ही "सांगलीला ग्रामपंचायत करा" असेही म्हटलं होतं असं काय करता येत असेल तर !!!!

https://www.loksandeshnews.com/2022/07/blog-post_86.html?m=1

 सांगलीतील नागरिक या प्रश्नाविषयी उत्स्फूर्त पाठिंबा देतील....

सलीम नदाफ, संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली
9850155823

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली