SANGLI:केंब्रिज स्कूलमध्ये प्रज्ञाशोध स्पर्धा उत्साहात .....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI:केंब्रिज स्कूलमध्ये प्रज्ञाशोध स्पर्धा उत्साहात .....



SANGLI
 लोकसंदेश न्यूज नेटवर्क


केंब्रिज स्कूलमध्ये प्रज्ञाशोध स्पर्धा उत्साहात....

संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल मध्ये प्रज्ञाशोध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये मेहंदी, केश रचना, नेल आर्ट, सॅलेड आणि फळांची रचना व कोरीव काम, पॉट डेकोरेशन, किल्ला बांधणी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आपला सहभाग घेऊन त्यांच्यातले सुप्त कलागुण दर्शवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.



या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुनिता कमलेकर, रसिका व्हावळ, एस. बी. शिंदे हे लाभले. शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याबद्दल माहिती सांगितली त्याचबरोबर किल्ले उभारणीसाठी आणि ते टिकवण्यासाठी मुलांनी केलेला प्रयत्न याबद्दल सांगितले. अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत विद्यार्थ्यांना सांगत होते, पुर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती. 

त्यामुळे गावातील काही ठरावीक लोकच गड किल्ले पाहायला जात होते. मग ते तिथुन आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत होते. त्यात किल्ल्याची बांधकाम शैली, त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती गोष्टीच्या रुपात सांगायचे. मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारत असत. सदर स्पर्धा स्कूलचे मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________