तासगाव तालुक्यातील गौण - खनिज उत्खननाची चौकशी करा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तासगाव तालुक्यातील गौण - खनिज उत्खननाची चौकशी करा...
लोकसंदेश न्यूज मीडिया नेटवर्क

तासगाव तालुक्यातील गौण - खनिज उत्खननाची चौकशी करा

*पत्रकार संघाची तहसीलदारांकडे मागणी : पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधातील खोट्या तक्रारीविरुद्ध उद्या तहसीलसमोर धरणे आंदोलन*


तासगाव तालुक्यात गौण - खनिज तस्करांनी नंगा नाच सुरू केला आहे. वाळू, मुरूम माफियांनी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची लूट सुरू केली आहे. स्टोन क्रशर चालकांनी तर उभ्या डोंगराला सुरुंग लावून निसर्गावरच बलात्कार करण्यास सुरुवात केली आहे. या गौण खनिज उत्खननाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार रवींद्र रांजणे यांना दिले आहे.

     तर दैनिक पुढारीचे पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधात खोटी तक्रार देणाऱ्या गौण खनिज तस्करांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पत्रकार संघाच्या वतीने उद्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.


     तासगाव तालुक्यात गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचे वाभाडे  काढणारी लेखमाला दैनिक पुढारीने सुरू केली आहे. ही लेखमाला सुरू होताच तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या बुडाखालील बचबच लपवण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. तर या तस्करांकडून हप्ते मिळवून आपले खिसे भरणाऱ्या महसुलाच्या अधिकाऱ्यांचीही चांगलीच फाटली आहे. तालुक्यातील गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांची सखोल चौकशी झाल्यास काळेबेरे बाहेर येणार आहे.

      दरम्यान, ही लेखमाला सुरू करणाऱ्या पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधात तस्करांनी खोटी तक्रार दिली आहे. या तक्रातीबाबत कोणतीही सत्यता पडताळून न पाहता कर्तबगार पोलिसांनीही जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खोटा गुन्हा दाखल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. याविरोधात तासगाव तालुक्यातील पत्रकार आक्रमक झाले आहेत. खोटी तक्रार दाखल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल व्हावा. तालुक्यातील गौण खनिज उत्खननाची चौकशी करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. या मागणीसाठी उद्या शुक्रवार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

    मुळात वाळू, मुरूम तस्कर तसेच उभ्या डोंगराला नागवून निसर्गाची 'वाट' लावणारे स्टोन क्रशर चालक हे काय साधू संत नाहीत. ही मंडळी फार अब्रुवान आहेत असे नाही. आपले काळे धंदे चालवण्यासाठी अधिकाऱ्यांची थुंकी झेलणारे तसेच त्यांचे खिसे गरम करणारी ही मंडळी कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवून महसूल विभागाला चुना लावत आहेत. 

      स्टोन क्रशर चालकांची कशीही आणि कधीही चौकशी केल्यास त्यांचे काळेबेरे चव्हाट्यावर येणार आहे. महसुलचे अधिकारी मात्र दर महिन्याला मिळणाऱ्या बिदागिमुळे चिडीचूप आहेत. गौण खनिज तस्करांकडून हप्ते गोळा करण्यासाठी काही राजकीय पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही बाब गंभीर आहे. गौण - खनिज तस्कर व त्यांना पाठिंबा देणारे हप्तेखोर अधिकारी हे स्वतः काचेच्या घरात राहतात. पत्रकारांनी या मंडळींच्या बारीकसारीक गोष्टीत लक्ष घातल्यास एकाचेही क्रशर सुरू राहणार नाही. मात्र तरीही ही मंडळी पत्रकारांवर तक्रार करण्याचे धाडस दाखवत आहेत. 


     तस्करांनी असे हजार गुन्हे दाखल केले तरी फरक पडत नाही. गुन्हे दाखल करून स्वतःच्या बुडाखालील घाण लपवता येणार नाही. शिवाय पत्रकारांचा आवाजही दाबता येणार नाही. मात्र म्हातारी मेलेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये. त्यामुळे बदनामी केल्याची खोटी तक्रार देणाऱ्या पिलावळींची प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे. अन्यथा लायकी नसणारी बांडगुळे पत्रकारविरोधात गरळ ओकण्यास मागेपुढे बघणार नाहीत.

लोकसंदेश न्यूज मिडीयम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.

_________________________________________________

संपादकीय...

महसूल खाते ...महाराष्ट्रातलं अव्वल दर्जाचे भ्रष्टाचारी खाते म्हणून ख्यातनाम असणारे खाते....

महसूल खात्याचे काय काय कारभार चालतात... हे सर्व पत्रकारांना माहिती आहे ... मात्र महसूल खात्यांच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना असे वाटते की, ''आम्ही डोळे झाकून दूध पितोय आणि कुणाला माहीतच नाही''

असो... सांगली जिल्ह्यात कुठे वाळूचा उपसा होतोय, कुठे गौण खनिज डोंगरे परस्पर खोदून मुरूम काढला जातो,कोठे N.A. मध्ये पैसे खाल्ले जातात, कोठे काय घडते हे सगळं जनतेला नसेल तर पत्रकारांना तरी ज्ञात आहे.. आणि असते..

महाराष्ट्रात ज्या काही भ्रष्टाचाराच्या बाबतीत लाच लूचपतच्या ज्या काही केसीस झालेल्या आहेत त्यामध्ये अव्वल दर्जाचे खाते म्हणजे महसूल खाते. ..

महसूल खाते म्हणजे पैशाचा ओघच.. सांगली जिल्ह्यामध्ये महसूल खात्याच्या प्रमुख अधिकारी पदावर येण्यासाठी आम्हाला असे कळते की, बोली लावली जाते...

आता महसूल खात्याचा प्रमुखच जर बोली लावून त्या पदावर आला तर खाली काम कसं चालणार हा एक चिंतनाचा विषय आहे....

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली चालणारे हे महसूल खाते. . त्याच बिल्डिंगमध्ये प्रमुख ऑफिस आहे, परंतु कुठल्याही नागरिकाचे काम वजन ठेवल्याशिवाय होत नाही... असं असताना देखील सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी का याच्याकडे डोळे झाक केली असावी?? ...हा एक प्रश्न जनतेला पडलेला आहे...

जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांचे अगोदर केबिन सिस्टम बंद करावेत ...आणि त्यांना बाहेरच्या टेबलवर बसवावे ...याचं कारण असं आहे की, हे केबिन मध्ये बसल्यानंतर त्यांना आम्ही राजे असल्यासारखे वाटते, ते स्वतःला कलेक्टर असल्यासारखंच समजतात...

हे अधिकारी केबिनमध्ये बसून काय काम करणार ती त्यांची लायकी नाही..

 त्यामुळे यांचे केबिन ,दरवाजे , दिमतीला शिपाई, सगळे बंद करा.  आणि या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या बरोबर टेबल व बाहेरच्या हॉलमध्ये मध्ये आणून बसवा... म्हणजे जनतेचा यांचा संपर्क होईल व लोकांची  कामे होतील ...महसूल खात्याचे प्रमुख असो.. किंवा त्यांच्या बरोबरीने काम करणारे खालचे अधिकारी असो... त्यांना केबिन देवून शिपाई देवून,आणि जनतेशी दूर ठेवण्यात कारण काय आज देखील आम्हाला कळत नाही..

माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या याबाबतीत त्वरित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे...

हे अधिकारी नक्कीच मंत्री नाहीत..त्यामुळे त्यांना जनतेत मिसळावच लागेल... स्वतःला मी मोठा अधिकारी असल्याची त्यांना खालच्या दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा बाधा झालेली आहे ..ती अगोदर त्यांच्याकडून काढून घ्या..  

महसूल खात्याच्या  प्रमुख जिल्हाध्यक्ष पासून खालच्या शिपायापर्यंत नागरिकांशी कोणतेही सलोख्याने बोललं जात नाही...

संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एजंटाचा धुमाकूळ आहे    एखादं काम स्वतः नागरिक घेऊन गेल्यानंतर होत नाही... परंतु एजंट  घेऊन गेले की, त्याच् काम त्वरित  केलं जात ...हे सर्व वरिष्ठ अधिकारी पासून शिपाई पर्यंत माहिती आहे. . यात देखील जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित लक्ष घालुन एखादं स्ट्रिंग
 ऑपरेशन करून एखाद्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला निलंबित करावं व यातून गोरगरिबांना भ्रष्टाचारातून वाचवावे व याच्यावर लगाम लावावा...

त्यांना माहीतच नाही, किंवा कळत नसेल की, आपला जो पगार येतो तो या जनतेच्या करामधून येत असतो परंतु ते त्यांना ज्ञात नसावं ...

या सर्व भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक वेळा संपत्तीची चौकशी देखील करण्याची गरज आहे..

यामध्ये पुरुष अधिकारी बरोबर महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे ..

या खात्यातील या लोकांची अशी धारणा झाली असावी..
की कोणी आमचं काहीही करू शकत नाही.. ..


आम्हाला असं कळते की, महसूल खात्याच्या सिस्टम मधून वरपर्यंत त्याचा हिस्सा जातो.... खरं खोटे .  देव जाणे. ... व त्यांचे अधिकारी जाणो....

तर आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने माननीय सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना
विनंती करत आहोत की, ही केबिन सिस्टीम बंद करा, लोकांची काम करण्यासाठी त्यांना स्वतः जातीने आपण लक्ष देऊन नागरिकांच्या, गोरगरिबांचे काम करण्यासाठी त्यांना आदेश करावेत....

 आपला, संपादक;  लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.

8830247886