SATARA: भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात;

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA: भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात;




सातारा प्रतिनिधी:  संभाजी गोसावी

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात;


फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर फलटण जवळ ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी पुलावरून 30 फूट खोल खड्ड्यात गेली.




पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या घटनेत आमदार जयकुमार गोरे किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीमधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर 2 दोघे किरकोळ जखमी आहेत.



गंभीर जखमी असणाऱ्या दोघांना उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आलं आहे. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचा सुरक्षारक्षक किरकोळ जखमी आहेत. दोघांवरही फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.