सातारा:जिजाबा पवार हे वेळे गावचे वैभव - ॲड. उमेश पवार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा:जिजाबा पवार हे वेळे गावचे वैभव - ॲड. उमेश पवार


लोकसंदेश न्यूज सातारा जिल्हा प्रमुख
दौलतराव पिसाळ

जिजाबा पवार हे वेळे गावचे वैभव - ॲड. उमेश पवार

ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई च्या चेअरमनपदी वेळे गावचे सुपुत्र मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री जिजाबा पवार व संचालक पदी शुभम जिजाबा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वेळे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून त्यांना त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या वाई तालुक्यातील वेळे हे गाव जरी लोकसंख्येच्या मानाने छोटे असले तरी तालुक्याच्या राजकीय पटलावर म्हत्वाची भुमीका बजावत असते .येथील मान्यवरांनी राजकीय सामाजिक शैक्षणीक सहकार अशा अनेक क्षेत्रातील मोठ मोठ्या पदांवर निष्कलंक यशस्वी कामगीरी करुन दाखवली आहे .गावच्या आणी तालुक्याच्या विकास कामांना साथ देणारे गाव म्हणून वेळे गावची वेगळी ओळख आहे .याच गावचे जिजाबा पवार एक आहेत त्यांनी मुंबईत राहुन आपली राजकीय सामाजिक शैक्षणीक सहकार क्षेत्रात ऊल्लेखनीय निस्वार्थ भावनेने आज पर्यंत केलेल्या कामाची ज्ञानदीप बॅंक परिवाराने घेतल्यानेच त्याची पोहच पावती म्हणून त्यांना ज्ञानदीप बॅंकेच्या चेअरमनपदी बसविल्याने वेळे ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी तरुण मंडळे आणी ग्रामस्थांनी बॅंकेच्या सर्व संचालक मंडळाला धन्यवाद देवून त्यांचे आभार मानले आहेत .

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. शशिकांत पवार, सरपंच रफिक इनामदार, ॲड.उमेश पवार, वाई बाजार समिती संचालक श्री. अशोक सोनवणे, सोसायटीचे चेअरमन श्री. शिवाजी पवार, माजी उपसरपंच संतोष नलावडे, माजी सरपंच मधुकर पवार, माजी चेअरमन बाळकृष्ण पवार, ज्योत्स्ना गायकवाड, नंदलाल पवार, मधुकर पवार, मोहन गाढवे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.