लोकसंदेश न्यूज नेटवर्क
कर्नाटकचे मुख्यमंत्री
सिद्धरामय्या यांच्या सत्काराला मोठ्या संख्येने लोक येणार - बसवराज पाटील
महानिर्धार मेळाव्याची सांगलीत जोरदार तयारी
:
कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव करून काँग्रेसला प्रचंड विजय मिळवून देणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री ना. सिद्धरामय्या यांच्या रविवार दि. २५ जून २०२३ सकाळी १० वाजता होणाऱ्या सत्काराला आणि काँग्रेसच्या महानिर्धार मेळाव्याला सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी आज काँग्रेस कमिटीत कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम, प्रभारी संजय बालगुडे, आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी बसवराज पाटील व संजय बालगुडे यांचा सत्कार करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातून तसेच सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष, नगरसेवक , पदाधिकारी, कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. यावेळी नंदकुमार कुंभार, डॉ. सिकंदर जमादार, किशोर जामदार, आनासाहेब कोरे, विशाल चौगुले, जितेंद्र पाटील, सुरेश शिंदे, नदुकुमार साळुंखे, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक मंगेश चव्हाण, संतोष पाटील, फिरोज पठाण, मयूर पाटील, संजय कांबळे, ब्लॉक अध्यक्ष सनी धोत्रे, बिपिन कदम, रवी खराडे, सुभाष खोत, आशिष कोरी, अमित पारेकर, व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. २५ जून २०२३ रोजी विशाल जनसागराच्या साक्षीने कर्नाटकचे मुख्यमंत्री ना. सिध्दरामय्या यांचा नागरी सत्कार आणि काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा मेळावा ही घटना सांगली व महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरणार आहे.
या कार्यक्रमामुळे देशात व महाराष्ट्रात काँग्रेस, सांगलीत काँग्रेस हा नारा घुमणार आहे.
हा कार्यक्रम सामान्य माणसाला दिलासा देणारा आहे. महाराष्ट्रातून महागाई व बेरोजगारी हद्दपार करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या मोहिमेला बळ देणारा आहे. हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नाही तर त्याचबरोबर नफरत छोडो.. भारत जोडो या खा. राहुल गांधी यांची राष्ट्रीय एकात्मता चळवळ मजबूत करणारा आहे.
महागाई आणि बेरोजगारी व शेतकरी - कामगार यांची दयनीय अवस्था संपुष्टात आणण्याचे रणशिंग फुंकणारा हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने जनता उपस्थित राहणार आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई
-----