सांगलीत नामचीन गुंड सचिन टारझन याचा खून, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगलीत नामचीन गुंड सचिन टारझन याचा खून, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात.....




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगलीत नामचीन गुंड सचिन टारझन याचा खून, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात.....


सांगली - पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, नामचीन गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझन याच्यावर आज सकाळी धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अहिल्यानगर येथे ही घटना घडली.




सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास काही अज्ञात तरुण त्याच्या घरात घुसले.त्या तरुणांनी सच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. काही मिनिटातच हल्ला करून ते पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सच्या टारझन याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सच्या टारझनवर खुनी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.




 सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे . दरम्यान सच्या टारझनवरील हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.