कामगार विकास बहुउद्देशीय सामाजिक व ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने *"सन्मान कर्तृत्वाचा, सोहळा आनंदाचा"* कार्यक्रम आयोजित

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कामगार विकास बहुउद्देशीय सामाजिक व ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने *"सन्मान कर्तृत्वाचा, सोहळा आनंदाचा"* कार्यक्रम आयोजितओंकार पोतदार
लोकसंदेश न्यूज वाई

शासनमान्य कामगार विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी *"सन्मान कर्तृत्वाचा, सोहळा आनंदाचा"* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात साजरा करण्यात आला. जवळपास दोनशे महिलांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नुकत्याच 'आऊसाहेब जिजाऊ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या व प्रतापगड उत्सव समिती निमंत्रक मा. विजयाताई भोसले, महिला मोर्चा सातारा जिल्हा सरचिटणीस भाजपा मा. वैशालीताई भिलारे, महिला डॉक्टर मा. रुपालीताई भुंजे, एंजल्स विंग स्कूल प्रिन्सिपल मा.निशिता खांडके, महिला पोलिस मा. क्षमा माने, अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती वाई शहर महिला संघटनेच्या सचिव मा. सारिका गवते, महिला आयोगाच्या वाई तालुका संरक्षण अधिकारी मा. पौर्णिमा बामणे, सहाय्यक संरक्षण अधिकारी मा.संतोष गायकवाड, रिटायर्ड पीएसआय मा. अशोक जाधव या प्रमुख मान्यवरांनी महिलांना योग्य मार्गदर्शन करून आयुष्यात उंच भरारी घेण्याकरिता प्रेरित केले.
कु. धनश्री महांगडे हिने हिरकणी ही एकपात्री कला सादर केली तसेच बालशाहीरा आरोही भोसले हिने शिवरायांचा पोवाडा तर कु. सिद्धी निकम हिने उत्कृष्ठ भारुड सादर करून त्याद्वारे संस्थेची आणि महिलांनी आपली संस्कृती कशी जपावी याची माहिती दिली. या सर्व चिमुकल्यांनी आपल्या कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संस्थेचे राज्य क्रिडा अधिकारी मा.श्री. विशाल कुमठे यांनी महिलांना मार्गदर्शन करून आत्मसंरक्षण प्रशिक्षण दिले. संस्थेमार्फत सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू वाटप करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित महिलांपैकी बऱ्याच महिलांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले.
संस्थेच्या राज्य कार्यकारिणी सचिव तथा महिला कल्याण विभाग प्रमुख मा.सौ. स्वातीताई भोसले यांनी संस्था स्थापनेपासून आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संस्थेकडून त्यांना *महाराष्ट्र हिरकणी पुरस्कार* प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे कामगार विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पहिल्या पुरस्काराच्या मानकरी सौ. स्वातीताई भोसले ह्या ठरल्या. शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष ह्यांनी आभार मानून जय जय महाराष्ट्र माझा ह्या राज्यगीताने कार्यक्रमाचा शेवट केला.
सदर कार्यक्रमास संस्थेचे राज्य क्रिडा अधिकारी तथा ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. विशाल आबासाहेब कुमठे, कामगार विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब हिरामण लगस, उपाध्यक्ष राकेश लगस, सचिव स्वातीताई भोसले, सहसचिव रवि बाबर, कार्याध्यक्ष जॉन्टी शिंदे, राज्य सदस्य संतोष बाबर, रोहिदास पवार, मंगेश लगस त्याचबरोबर बबन साळुंखे, दादा बाबर, डॉ. विजय शिंदे, दिपाली शिंदे, सोमनाथ मोरे, सागर आमराळे, प्रिया चौगुले, सुवर्णा रांजणे इत्यादी उपस्थित होते. तसेच संकेत झणझणे, दत्ता शिंदे, संदिप भोसले, शिवानी पिठे, साहिल शिंदे, मकरंद चव्हाण, मयुरेश सूर्यवंशी, रोहन देशपांडे, धीरज गायकवाड, स्वप्नील पवार, छाया मांढरे ह्यांनी विशेष सहकार्य केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.

________________________________________________________

बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत..
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रा.ली.व ईस्टेट 99 इंडिया, मुंबई.
संपर्क:8830247886

__________________________________________________________________