सातारा पोलीस अँक्शन मोडवर साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई: पोलीस अधीक्षक समीर शेख.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा पोलीस अँक्शन मोडवर साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई: पोलीस अधीक्षक समीर शेख.

ओंकार पोतदार - वाई प्रतिनिधी 

सातारा पोलीस अँक्शन मोडवर साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई: पोलीस अधीक्षक समीर शेख.
 
   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस अँक्शन मोडवर असुन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला आहे. यासाठी तब्बल साडेचार हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. निवडणुकीच्या काळात अवैधरित्या प्रकार टाळण्यासाठी रूट मार्च कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल व केंद्रस्तरावरील सीएफएफची मदत घेणार असल्यांचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. राज्य राखीव बरं सीआरपीएफ होमगार्डचे संख्याबळ आम्ही बंदोबस्तासाठी उपयोगात आणणार आहे. मतदारांना प्रलोभन, दाखवण्यासाठी पैशाचे वाटप अंमली पदार्थाचे वाटप होत असेल तर त्यावर आम्ही लक्ष ठेवून कारवाई देखील करणार आहोत. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीसांनी अधिक सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर विशेष भर जाणार दिला जाईल. तसेच मागील निवडणुकीमध्ये ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल  आहेत अशा व्यक्तींचे  रेकॉर्ड तपासले जात असून. निवडणुक होण्यापूर्वी जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या व्यक्तीकडे शस्त्र परवाना आहे. त्यांना निवडणुकीआधीं आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात शस्त्र जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर आमचे विशेष लक्ष असेल अशा व्यक्तींचा शोध घेवुन त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रा. ली. मुंबई/सांगली.