लोणार मधील 200 एकरातील दुर्गाटेकडीवरील वनराईत अग्नीतांडव; शेकडो दुर्मिळ वृक्ष आगीच्या भक्षस्थानी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लोणार मधील 200 एकरातील दुर्गाटेकडीवरील वनराईत अग्नीतांडव; शेकडो दुर्मिळ वृक्ष आगीच्या भक्षस्थानी

LOKSANDESH NEWS 

लोणार मधील 200 एकरातील दुर्गाटेकडीवरील वनराईत अग्नीतांडव; शेकडो दुर्मिळ वृक्ष आगीच्या भक्षस्थानी

        जगप्रसिद्ध असलेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर हे बुलढाण्यातील लोणार मध्ये. या लोणार सरोवराला लागून असलेल्या  लोणी रोडवरील दुर्गा टेकडी परिसरातील जवळपास 200 एकर वनराईला भीषण आग लागली आहे. या आगीत शेकडोंच्या संख्येतील वृक्ष आगीच्या भक्षस्थानी सापडले.

 याशिवाय वनराईत असलेले वन्यप्राणी देखील काही होरपळले आहे. तर शेकडो पक्षी, पक्षांची घरटे, पक्षांची अंडे आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.

 लोणार नगरपालिकेचे अग्निशामक दल वेळेवर पोहोचले नसल्यामुळे खाजगी टँकर बोलावून दुर्गा टेकडी संस्थान ट्रस्टने आग विझवण्याचा प्रयत्न केला. रिसोड नगरपालिकेचे देखील अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठीचे आवश्यक साहित्य वनराईत दूरपर्यंत पोहोचले नाही.

 स्थानिकांनी झाडांचा पालापाचोळा तोडून जीव धोक्यात घालून आग विझवली आहे.