LOKSANDESH NEWS
ठाण्यातील नौपाडा पोलिसांच्या वतीने 2023 ते 2025 दरम्यान गहाळ झालेले शंभरमोबाईल आज तक्रारदारांना हस्तांतरण
सन २०२३ ते माहे मार्च २०२५ या दरम्यान नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तक्रारदार नागरीक यांचे गहाळ झालेले मोबाईलचा नौपाडा पोलीस स्टेशन मधील सायबर कक्षाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेवुन विविध कंपन्यांचे एकुण १०१ मोबाईल फोन परत मिळवुन तक्रारदार यांना आज दि २२/०३/२०२५ रोजी परत करण्यात आले आहेत.
वरील कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा. विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त परि ०१ सुभाष बुरसे, मा. सहायक पोलीस आयुक्त नौपाडा विभाग प्रिया ढमाळे, मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक नौपाडा पो. स्टे अभय महाजन, मा. पोलीस निरीक्षक (प्रशासन) सुनिल तांबे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, पोलीस अंमलदार ८१८८ करणकुमार पाटील, पोलीस अंमलदार ४७९५ अशोक कोल्हे पोलीस अंमलदार ३९८८ प्रतिक बावणे पोलीस अंमलदार २५५६ गंगाधर तिर्थकर यांनी सदरची कामगिरी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली