मुंबई विद्यापीठाच्या मनमानी कारभाराविरोधात युवासेना पदवीधर सिनेट सदस्य आक्रमक
मुंबई विद्यापीठाची वार्षिक अधिसभा (सिनेट) आज पार पडणार आहे. ही बैठक वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात युवासेना पदवीधर सिनेट सदस्य आणि बुक्टू प्राध्यापक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहेत. दरम्यान, युवासेना आधीसभेपूर्वी आक्रमक झाली आहे. विद्यापीठाबाहेर सध्या सिनेट सदस्यांचं आंदोलन सुरु आहे.
प्रदीप सावंत सिनेट सदस्य
- आत्ताच त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांबाबत एक भाष्य केलं
- आपल्याकडे परदेशी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे 148 आहे
- विद्यार्थ्यांकडून जे चार्जेस घेतले जातात ते कमी घेतले तर विद्यार्थ्यांची संख्या हजारो मध्ये जाईल
- आतापर्यंत 80 हजार रुपये घेऊन विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जातो परदेशी विद्यार्थ्यांकडे ते पैसेवाले म्हणूनच पाहत असतात
- माझ्याकडे एका मुलीचे केस आली होती त्या तिच्या वडिलांचा जॉब गेला होता म्हणून ती इंडियामध्ये शिकण्यासाठी आली होती
- कागदपत्र त्यांना दाखवले अगोदर 80 घ्यायचे आता 65 हजार घेतात
- निवडणुकीच्या अगोदर एक वर्ष त्यांनी टेंडर प्रक्रिया केली नाही त्या काळात विद्यार्थ्यांकडून त्यांनी पैसे घेतले मग ते पैसे आता घ्यायची गरज काय
ऑन हुकूमशाही
- भरपूर मोठ्या प्रमाणावर हुकूमशाही आहे
- आता असं वाटतंय आरएसएस दार्जीने पदाधिकारी आहेत
- राज्यात भाजपाचे सरकार केंद्रात भाजपा सरकार त्यांना सत्तेची गुर्मी आलेली आहे
- हुकूमशाही पद्धतीने मीटिंग संपवली जाईल याकडे त्यांचे लक्ष आहे
- जे वादग्रस्त प्रश्न आहेत त्याकडे कानाडोळा करतात
- अजून बराच टप्पा बाकी आहेस
- स्थगन प्रस्ताव यायचाय जिथे जिथे मुंबई विद्यापीठ चुकते ते त्यांच्या निदर्शनास आणून देणार
- दोन वर्षे झाले एक तर आम्ही सिनेटमध्ये नव्हतं
- त्यांच्यावर भाजपाचा दबाव होता त्यामुळे आम्हाला मिटींगला बोलवत नव्हते
- त्यांची अडचण आम्ही समजत होतो आम्ही सप्टेंबर मध्ये निवडून आलो
- सप्टेंबर पासून आतापर्यंत एक जॉईन मीटिंग झाली नाही
- प्रमाणपत्रावरील स्पेलिंग मिस्टेक, कल्याण सेंटर आले ते सेंटर कॅन्सल झाले असे अनेक गोंधळ
- आमचं काम फक्त विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मीटिंग लावत होतो त्यांची गुर्मी आहे मिटींग लावायची परवानगी देत नाही
- टोटल सिनेट 75 आहेत त्यात फक्त विद्यार्थी सिनेट दहा आणि बुकटूचे आठ असे 18 सदस्य बोलतात
- बुकटूच्या 20 ऐवजी आता दहा सीट केले आहेत भाजपचे हे लॉंग लाइफ धोरण आहे कशा पद्धतीने ऍक्टिव्ह लोकांना कमी करता येईल त्यामुळे ही दडपशाही सुरू आहे
- आताची बैठक वादळी ठरते आहे विद्यापीठाच्या कुलगुरू जे प्रश्न विचारतो त्याचे उत्तर नाही