घटना स्थळवरून मिळालेली माहिती अशी की आदित्य दीपक दाभोळकर सध्या रा. वारणानगर मूळ गाव जेऊर ता पन्हाळा हा आज रविवार दि.16रोजी सकाळी आई सोबत अंथरून धुण्यासाठी आला होता.
अंथरूण धुवून झाल्यानंतर आईला घरी सोडून तो पुन्हा परत मित्रांच्या सोबत दुपारी तीन वाजता वारणा नदीच्या छोट्या पुलावर आला व पुलावरून पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी उडी मारली मात्र पाण्याची धार मोठी असल्याने तो गटकाळ्या खात असल्याचे त्याच्या मित्रानी पाहिले मात्र काही वेळाने तो पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याने कुठे दिसून आला नाही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग के डी आर एफ पथक दाखल झाली असून शोध मोहीम सुरु. होती आज
ठीक सात वाजता नदीपात्रामध्ये आदित्य चा मृतदेह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग के डी आर एफ या पथकाने बोटीच्या सहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढून उत्तरे तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिला सदरच्या मोहिमेत कृष्णात सोरटे शुभम काटकर प्रथमेश येरुडकर शैलेश हांडे अमर पाटील महेश पाटील रोहन चौगुले सुरज पाटील आदिनाथ कांबळे प्रथम केसरकर यांनी काम पाहिले
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली