आम्हाला आडवा, पण आंदोलन होणार म्हणजे होणार - शर्वरी तुपकर
शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिस आणि सरकार कडून होतोय. रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकरांनी केले शहीद शेतकरी कैलास नागरे यांना अभिवादन. शेतकऱ्यांचे सोयाबीन कापसाला भावफरक द्यावा, संपूर्ण कर्जमुक्ती करावी, पीक विमा यासह विविध प्रश्न घेऊन रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह मुंबईचे अरबी समुद्रात सोयाबीन, कापूस आणि सातबारा बुडवून प्रतिकात्मक आंदोलन करणार होते.
आज रविकांत तुपकरांसह कार्यकर्ते मुंबईच्या दिशेन निघणार होते. मात्र, संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले. कायदा व सुव्यास्थेची काळजी घेऊन आंदोलन करणार होतो. आमच्या घराला ही पोलिसांचा पहारा लावण्यात आलाय. दहशतवाद्याला इतकी सुरक्षा नसते. मात्र, आम्ही पोलिस सुरक्षेत अभिवादनाला नागरे यांच्या घरी गेलो. सरकारला दोन समाजात तेढ माजवण्यात इंटरेस्ट आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिस आणि सरकार करून होतोय. सरकारला इशारा आहे की, तुम्ही कितीही शेतकऱ्यांना ताब्यात घ्या, आम्हाला आडवा, पण आंदोलन होणार. आंदोलन होणार म्हणजे होणार.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली